बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) आतापर्यंत १५१ जागा जिंकल्या आहेत. यासह, पक्ष बहुमताच्या जवळ आहे आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा दिसत आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागांवर जिंकले आहेत. त्यामुळे आता बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीचं सरकार स्थापन होणार आहे.



बांगलादेशाच्या निवडणुकीत बीएनपीचा विजय झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


बांगलादेश निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपी नेते तारिक रहमान यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, हा विजय बांगलादेशच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. दोन्ही देश त्यांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करतील अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ