T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नामिबिया हा सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली या मैदानात हा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळू शकेल की नाही यावर शंका व्यक्त केली जात असतानाच ईशान किशन देखील जखमी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे कर्णधार सूर्याच्या अडचणी वाढल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि नामिबिया या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव केला. या वेळी ईशान किशनच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराहनं टाकलेला यॉर्कर ईशान किशनच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. ज्यामुळं ईशान किशनला सरावादरम्यान वेदना होत असल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ईशान किशन फिजिओकडून उपचार घेत असल्याचं देखील पाहायला मिळालं.


ईशान किशनला दुखापत झाली असली तरी चांगली बाब म्हणजे त्यानं पुन्हा सराव सुरु केला. मात्र, दुसऱ्यांदा सराव सुरु केल्यानंतर त्यानं लगेच पुढील ५ मिनिटांमध्ये सराव बंद केला. बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ईशान आजची मॅच खेळू शकेल की नाही हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र या घडामोडींमुळे करणार सूर्यकुमारच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे.





अभिषेक शर्मा आजच्या मॅच मधून बाहेर ?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक शर्मा आजारी आहे. त्याचं पोट बिघडलं आहे आणि त्याला तापही आहे. त्यामुळे तो हा सामना खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याला संघ प्रशासनाकडून विश्रांती दिली जाईल, असं चिन्ह आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानशी आहे. त्या सामन्यापूर्वी अभिषेकची तब्येत ठीक होणं जास्त महत्त्वाचं आहे.



सामना कुठे पाहता येईल ?


टी-२० विश्वचषकाचे प्रसारणाचे हक्क भारतात स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. यात इंग्रजी व हिंदीसह तामिळ, कन्नड, भोजपुरी, मराठी, बंगाली, तेलुगू अशा भाषांमध्येही हा सामना पाहता येईल. तर ऑनलाईन हा सामना जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि वेबसाईटवर पाहता येईल.


भारतीय संघ :- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, रिकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर


नामिबिया संघ :- गेरार्ड इरास्मुस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शोल्झ, रुबेन ट्रेपलमान, जेजे स्मिट, जैन फ्रिलिंक, लॉरेन स्टिनकैप, मालन कुगर, निकोल लॉफ्टी-इटन, जॅक ब्रसेल, बेन शिकाँगो, जेसी बॉल्ट, ठापतन लिशर, डब्ल्यूपी मायबर्ग आणि मॅक्स हेगो.

Comments
Add Comment

IPL 2026 : पहिल्या सामन्याआधीच RCB ला धक्का! 'हा' स्टार खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि

IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवरून आयपीएल २०२६ श्रीगणेशा! जाणून घ्या RCB vs SRH ची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ? मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू