T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नामिबिया हा सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली या मैदानात हा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळू शकेल की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे.



अभिषेक शर्मा आजच्या मॅच मधून बाहेर ?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक शर्मा आजारी आहे. त्याचं पोट बिघडलं आहे आणि त्याला तापही आहे. त्यामुळे तो हा सामना खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याला संघ प्रशासनाकडून विश्रांती दिली जाईल, असं चिन्ह आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानशी आहे. त्या सामन्यापूर्वी अभिषेकची तब्येत ठीक होणं जास्त महत्त्वाचं आहे.


भारताने अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना २९ धावांनी जिंकला. पण, पहिली फलंदाजी करताना आघाडीच्या फळीची दमछाक झाली. त्यामुळे नामिबियाविरुद्ध फलंदाजांसमोर नेटाने खेळण्याचं आव्हान असणार आहे.



फलंदाजांना फायदा :


वानखेडे मैदानावरील खेळपट्टीच्या तुलनेत दिल्लीतील अरुण जेटली मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजांना साथ देईल अशी अपेक्षा आहे. दिल्लीत वातावरणातील धुक्याचा सामना दुसरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागणार आहे. नामिबियाविरुद्धचा सामना असल्यामुळे आणि अभिषेकच्या आजारपणामुळे संजू सॅमसनला निव्वळ फलंदाज म्हणून संधी मिळेल हे जवळ जवळ निश्चित आहे.


भारत वि. नामिबिया


ठिकाण - अरुण जेटली स्टेडिअम, नवी दिल्ली


वेळ - संध्या ७ वाजल्यापासून



सामना कुठे पाहता येईल ?


टी-२० विश्वचषकाचे प्रसारणाचे हक्क भारतात स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. यात इंग्रजी व हिंदीसह तामिळ, कन्नड, भोजपुरी, मराठी, बंगाली, तेलुगू अशा भाषांमध्येही हा सामना पाहता येईल. तर ऑनलाईन हा सामना जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि वेबसाईटवर पाहता येईल.


भारतीय संघ :- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, रिकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर


नामिबिया संघ :- गेरार्ड इरास्मुस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शोल्झ, रुबेन ट्रेपलमान, जेजे स्मिट, जैन फ्रिलिंक, लॉरेन स्टिनकैप, मालन कुगर, निकोल लॉफ्टी-इटन, जॅक ब्रसेल, बेन शिकाँगो, जेसी बॉल्ट, ठापतन लिशर, डब्ल्यूपी मायबर्ग आणि मॅक्स हेगो.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड