Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार स्वाभिमानाने करण्यात आला असून त्यातून देशाचा फायदाच होणार असल्याचेही बन यांनी नमूद केले.



भारत- अमेरिका व्यापार करार भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा



भारत-अमेरिका व्यापार करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतमाता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चरणी गुलाम ठेवली असा आरोप करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत बन म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करार हा ताठ मानेने, देशहिताला प्राधान्य देत करण्यात आलेला आहे. त्यात कोणतीही गुलामगिरी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे.



महापालिकेमध्ये दाऊदच्या घोषणा द्यायच्या का?



महापालिका सभागृहात घुमलेल्या ‘मोदी, मोदी’ आणि ‘देवाभाऊ’च्या घोषणांनी राऊतांना आणि विरोधकांना कानठळ्या बसल्या. कारण भाजपा महायुती सरकारच्या विकास, पारदर्शकता आणि ठाम निर्णयक्षम नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची पोचपावती या घोषणांतून दिसली. महापालिकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि देवा भाऊंच्या घोषणा द्यायच्या नाही तर काय राऊत किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का? असा खोचक सवालही बन यांनी केला .



अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे राजकारण



अजित दादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. या अपघाताची गंभीर दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरांवर घेतली गेली आहे. केंद्र सरकार, एअरपोर्ट अथॉरिटी तसेच राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. शरद पवार यांनीही या अपघातात घातपाताची शक्यता फेटाळून लावली असताना अशा संवेदनशील प्रकरणात रोहित पवार जाणीवपूर्वक खोटे आणि निराधार आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका बन यांनी केली.



संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार



अजित दादांनी शेवटच्या दिवशी कोणत्या फाईलवर स्वाक्षरी केली, याची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून मिळेल. भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स स्व. अजितदादांकडे होत्या अशी आरडाओरड करत नाहक पत्रकार परिषदांमधून हवेत तीर मारण्याऐवजी राऊतांकडे या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत असे आव्हान बन यांनी दिले. योग्य तपास करून सत्य समोर आणले जाईल अशी ग्वाही बन यांनी दिली.


माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत बन म्हणाले की, कोविड काळात राऊत आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासमोर उघडे करण्याचे काम तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. कोश्यारी नसते तर कोविड काळात महाराष्ट्राचे वाटोळे तुम्ही केले असते असा हल्लाबोल बन यांनी केला.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू