यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला केसांना ब्राऊन रंग देण्यामागील खास कारण जाणून घ्या

यंदाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या मोसमात सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढलेले दिसतील. प्रेमाच्या ऋतुमानात सौंदर्यही खुलेल. या सौंदर्यात दरवेळचा ट्रेण्ड मोडित काढत नवे काहीतरी पाहायला मिळेल. यंदा व्हेलेंटाईन डे साजरा करताना केसांना सर्वात रोमँटिक रंग देता येईल. यंदा इतरांना थक्क करण्यासाठी केसांना ब्राऊन (तपकिरी) रंग देणे उचित ठरेल. हा गंर केवळ साधा तपकिरी नसून, त्यात अनेक विविध छटा आहेत. एका प्रकारची कमालीची आकर्षकता दडलेली आहे. गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मूलिया यांच्या मते, या मोसमात ब्राऊन हा ख-या अर्थाने प्रेमाचा रंग ठरेल. या रंगातील नैसर्गिक चमक, सुटसुटीत लेयर्स केसांचे सौंदर्य अधिक खुलवतात. केसांना रोमँटिक लूक येतो. हा रंग प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला साजेसा ठरत असल्याने सध्या हा रंग सर्वांच्या आवडीचा असल्याचे त्यांनी सांगितले.


ब्राऊन रंग नैसर्गिक सौंदर्याशी मिळताजुळता असल्याने अधिक प्रभावी ठरतो. रोस्टेड आलमंड, हॉट चॉकलेट आणि बटरस्कॉच ब्लॉन्ड यांसारख्या शेड्समध्ये उबदारपणा आणि सुसंस्कृतपणा यांचा उत्तम मेळ दिसतो. या रंगांत दडलेल्या साधेपणामुळेच लोक आपोआप ब्राउन हेअर कलरकडे आकर्षित होतात. सलोन व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांसाठीही ब्राउन हा रंग उत्तम पर्याय आहे. हा रंग भारतीय त्वचेच्या विविध छटांवर सहज उठून दिसतो. वेगवेगळ्या प्रकाशझोतात या रंगाचे सौंदर्य अधिकच बहरते. नवे केस आल्यानंतरही हा रंग मूळ रंगाशी साधर्म्य साधतो. या सर्व कारणांमुळे हा रंग सर्वांच्या पसंतीस उतरतो. ब्राऊन रंगामुळे केसांच्या सौंदर्याला आगळीवेगळी ओळख मिळते.


तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास ब्राऊन रंग ख-या अर्थाने कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. भडक रंगाच्या तुलनेत ब्राऊन शेडमध्ये केसाच्या रंगाचा समतोल राखला जातो. या रंगात केसाच्या नैसर्गिक छटांना महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, हलका सोनेरी चमक असलेला रोस्टेड आलमंड ब्राऊन रंग चेह-याची ठेवण अधिक मृदू आणि आकर्षक बनवतो. हॉट चॉकलेटसारखी गडद शेड केसांना जाडपणा देत नाही. या रंगामुळे केसांमध्ये वेगळीच चमक आणि समृद्धी दिसून येते. बटरस्कॉच ब्लॉन्डचा वापर योग्य पद्धतीने केल्यास केसांचा नैसर्गिक तजेलपणा कायम राहतो. केसांसाठी हे रंग तयार करण्यासाठी तज्ज्ञ कोणतीही घाई करत नाहीत. याकरिता अचूकता आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे लागते.


शास्त्रीय कारणाच्या आधारावरही ब्राऊन रंगाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या रंगामुळे केस सुदृढ दिसतात. ब्राऊन रंगाच्या विविध छटांवर प्रकाश सर्व बाजूंनी समान रीतीने परावर्तित होतो. केसांना नैसर्गिक चमक मिळते. केसांचा पोतही मऊ आणि गुळगुळीत होतो. केसांमधील नैसर्गिक मेलॅनिनच्या छटांशी जुळणाहा हा रंग असल्याने केसांचा दाटपणा टिकून राहण्यास मदत होते. फिकट किंवा हाय-लिफ्ट शेड्समध्ये केस पातळ वाटू शकतात. यामुळेच ब्राऊन रंगामुळे केसांना योग्यरितीने लवचिकता येते. बरेचदा केसांना रंग लागल्यावर निस्तेजपणा दिसून येतो. मात्र ब्राऊन रंग केसांना समृद्धी देतो.


सांस्कृतिकदृष्ट्या विचार केल्यास ब्राऊन रंग आधुनिक प्रेमाच्या बदलत्या स्वरुपाशी अगदी चपलख बसतो. आजच्या काळातील व्हलेंटाईन डे हा केवळ मोठ्या थाटामाटाच्या प्रदर्शनापुरता मर्यादित नसून, हा दिवस कॉफी डेट, शांतपणे एकत्रित घालवलेली रात्रीच्या जेवणाची वेळ आणि रोजच्या जगण्यातील जिव्हाळ्याच्या क्षणांवर आधारित आहे. हा सौम्य आणि मोहक रंग नेमका याच बदलास साजेसा ठरतो. यामध्ये कोणताही बडेजाव किंवा देखावा नसून, एका प्रकारचा आत्मविश्वास आणि नैसर्गिक आकर्षक आहे. या रंगामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे दिसून येते.


ब्राऊन रंग वैयक्तिक आवडीनुसार बदलता येतो. केसांना अधिक चमक देण्यासाठी ग्लॉसिंग, गडद ब्राऊन रंग दिसावा याकरिता लो-लायटिंग किंवा चेह-याची ठेवण उठून दिसावी याकरिता सॉफ्ट कॉन्टूरिंग असे पर्याय उपलब्ध आहेत. हे रंग केसांचे सौंदर्य वाढवण्यासह रोजच्या वापरासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. केसांसाठी हा रंग स्विकारताना तुम्हांला तुमच्या मूळ व्यक्तिमत्त्वात कोणताही बदल करण्याची गरज भासत नाही. ब्राऊन रंग तुमच्या नैसर्गिक सौंदर्याला प्रखरतेने सर्वांसमोर मांडतो.


यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ब्राऊन रंगाच्या विविध छटा प्रेमाच्या बदलत्या स्वरुपाचे दर्शन घडवत आहेत. हे रंग अधिक मवाळ, वैयक्तिक आणि नैसर्गिक रंगाशी साधर्म्य साधतात. कोणत्याही अट्टाहासाशिवाय समोरच्या व्यक्तीवर कायमस्वरुपी प्रभाव टाकणारे हे सौंदर्य ख-या अर्थाने मनाला आकर्षित करते. केसांच्या सौंदर्याच्या भाषेत सांगायचे झाले तर हा रंग संबंधिताचा आत्मविश्वास द्विगुणित करतो, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उबदारपणा देतो. हा रंग खानदानी सौंदर्याचे प्रतीक आहे. ब्राऊन रंग संबंधिताची वेगळी आणि प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत करतो.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी 'या' आरोग्यवर्धक पदार्थाचं सेवन करा, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी

गुढी पाडवा स्टाइलमध्ये साजरा करा: नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक फॅशन निवडी

मुंबई : मराठी नववर्षाच्या आगमनासोबत गुढी पाडवा सण आनंद, नवचैतन्य आणि उत्साह घेऊन येतो. या खास दिवशी आपल्या

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Women's Day 2026: पहिला महिला दिन कधी साजरा झाला?; त्यामागचा इतिहास जाणून घ्या

मुंबई: ८ मार्च ही केवळ एक तारीख नसून, ती लाखो महिलांच्या त्या संघर्षाचे आणि संकल्पाचे प्रतीक आहे, जो त्यांनी

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक