Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने खरं फुटेज दाखवलं नाही; पत्रकार परिषद घेत दिव्या शिंदेचा गंभीर आरोप

मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टी करण्यात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेनं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या टीमवरही गंभीर आरोप केले आहेत.



काय म्हणाली दिव्या शिंदे ?


बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली स्पर्धक दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी निवड कशी केली जाते? याबाबत बोलताना म्हणाली की, "त्यांची टीम माझ्याकडे आलेली. तीन मिटिंग झालेल्या. मी काही अटी ठेवलेल्या. त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं, मी फिजिकली फिट नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितलं, 'नाही नाही ताई...आम्ही काळजी घेऊ..."


पुढे बोलताना, "माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा मी रडत होते जोर-जोरात. माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाहीये...", असं दिव्यानं सांगितलं.



'बिग बॉसनं खरं फुटेज दाखवलंच नाही'


बिग बॉसनं टास्क दरम्यान दिव्या आणि इतर स्पर्धकांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक बाचाबाचीचं सर्व फुटेज काही दाखवलं नाही, असा आरोप केला आहे. तसेच, स्पष्टीकरण देताना तिनं सांगितलं की, "ज्यावेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते, त्यावेळी मी म्हणालेली मला शो सोडायचाय. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर गोष्टी यायला लागल्या आहेत. हे कायम मला Poke करतायत. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलेलं, या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलं नाहीये. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले, ही धमकी आहे धमकी आहे म्हणत, त्यामध्ये जे संभाषण आहे, तिथेही मी माझा मुद्दा मांडलेला. पण, त्यांनी ते दाखवलं नाही..."


"प्राजक्ता शुक्रेनं मला सांगितलं की तू म्हण 'शब्दांची तलवार' त्यावर मी तिला म्हटलं, 'अगं, तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यातच हे होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही त्यांनी दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनावणे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं, कन्फेशन रूममध्ये जाण्याअगोदर, पण त्यांनी ते फुटेजसुद्धा दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केला, त्यांनी बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्न केला...", असं दिव्या शिंदेनं सांगितलं.

Comments
Add Comment

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च)

CM Devendra Fadnavis : राज्यात पीएनजीला वेग, खतसाठ्यावर सतत नजर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण अवलंबले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी