दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु असून सलग चौथ्या दिवशीही दादर रेल्वे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाई सुरुच आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पोलिस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दादर परिसर फेरीवालामुक्त झाल्याचे दिसून आहे. मात्र, ही कारवाई किती दिवस असेल असा सवाल दादरकरांकडून केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधातील कारवाई जोरात सुरु आहे. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तसेच पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून बोरीवली,मुलुुंड, वरळी, लोअर, मोहम्मद अली रोड, कुर्ला, दादर पूर्व आदी भागांतील कारवाई जोरात सुरु आहे.त्यातच दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या बाजुला तसेच केशवसूत उ्डाणपुलाखाली सर्व गाळ्यांसह रानडे मार्ग, सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग तसेच केळकर मार्ग आदी ठिकाणी मागील सोमवारपासून जोरदार कारवाई करून सर्वच फेरीवाल्यांना पोलिस आणि महापालिकेच्यावतीने हटवले जात आहे. त्यामुळे मागील सोमवारपासून दादर पश्चिमचा परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता दिलासा व्यक्त केला जात असून ही कारवाई पुढेही कायम ठेवण्याची मागणी होत आहे.


महापालिकेच्यावतीने दादर पश्चिम रेल्वे स्थानकाला पडलेला फेरीवाल्यांचा विळखा सोडवला जात नसल्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेतून याचे व्हिडीओ शुटींग करत एका रुग्णवाहिकेला दादरमधून बाहेर पडताना किती वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो याचा पुरावा दिला.त्यानंतर त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याच्या हालचाली केल्या होत्या. परंतु सत्यस्थिती दर्शवल्यानंतर पोलिस आणि महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली असून सोमवारपासून फेरीवाला मुक्त केलेला दादर गुरुवारीही तसाच दिसून आला. त्यामुळे या कारवाईचे समर्थन करणाऱ्या दादरकरांकडून आता मात्र, ही कारवाई पुढेही कायम राहावी अशी मागणी केली जात आहे. दादरकरांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत तरी कारवाई कायम राखावी, जेणेकरून दादरकरांना गर्दीतून अडखळत स्थानक आणि घर गाठण्याची वेळ येणार नाही.

Comments

Deepak Yadav    February 14, 2026 08:05 AM

कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक बाहेर खूप जास्त फेरीवाले बसलेले असतात त्याच्यावर पण कायम ची कारवाई झालीच पाहिजे

Jyotsna Gokhale    February 14, 2026 05:10 AM

ही कारवाई कायमस्वरूपी असावी हीच सर्वाधिक ईच्छा मराठी फेरीवाले त्यांची पण सोय करण्यात यावी कारण त्याना पण संसार, मुल आहेत. नाईलाजाने ते रस्त्यावर धंदा करतात.

Sunil Rane    February 14, 2026 02:52 AM

अशी कार्यवाही सगळ्या महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि जो कोणी गाडी पोहोचायच्या अगोदर फेरीवाल्यांना फोन करून कळवतो त्यांना शोधून सस्पेंड करा. सगळी माहिती अगोदरच दिली जाते त्यामुळे गाडी आल्यावर कोणीही सापडत नाही.

Vinayak Arolkar    February 14, 2026 02:31 AM

अनधिकृत बांधकाम ह्या वर देखील कार्यवाही होणे अंत्यत आवश्यक आहे. झोपडपट्टी दादा राजरोसपणे शासन व पालिकेच्या डोळ्यांदेखत झोपडपट्टया सरासर बांधून वाममार्गाने पैसे कमवतात त्यांच्यावर का कार्यवाही केलेली जात नाही. शासनाला व पालिकेला समजले नसेल, ते जनतेला काय मुर्ख समजतात? ह्या लोकांचे जी साटेलोटे बाबतीत मोठी साखळी आहे हे जनतेला चांगलच माहिती आहे

GANESH EKNATH KSHIRSAGAR    February 14, 2026 01:22 AM

जोगेश्वरी स्टेशनं रोड वरपण कोणी तरी लक्ष दया

SANTOSH RAGHAVAN    February 14, 2026 12:38 AM

फेरीवाले मुक्त फूटपाथ किती दिवस राहतील ते बघूया??? धारावी labour कॅम्प मध्ये tailor / mobile रिपेअर / khangress ऑफिस / बिर्याणीवालाची पक्की दुकानें फूटपाथ वर आहेत ती कधी काढणार???? पाहू,सुरुवात ठीक दिसते!!!

Prasad    February 13, 2026 11:14 PM

Appreciate.same action should be on illegal zopadpatti.i am sure all mumbaikars will appreciate this.

FRANCISCA PHILIP DSA    February 13, 2026 09:01 PM

I do appreciate the work taken in hand by Our honarable Mayor it should be continued and lasting forever because of this hawkers recently we lost our hospital staffs in accident on the spot death as well as out side Sion hospital footpath near gate no1 these hawkers are havok wth gas cylinder preparing Dosa and parathas and it really becomes very difficult to enter and walk on the footpath near gate no1.due to this nowadays share taxi are also creating a tremendous problem on the road I hope here also things to be cleared and in future these hawkers should be arround the campus of sion hospital as it becomes a problem even for any patient coming in a cab or ambulance to enter as well as all hospital redevelopment work is going on it has become horrible scene internally.

Sanjay Ankalikar    February 13, 2026 08:13 PM

At sion also such strict action required. Hawkers are cooking on foothpath with big LPG cylinders.

चंद्रकांत दांडेकर    February 13, 2026 02:07 PM

दादर (पूर्व) येथे सेंट्रल रेल्वे परीसरात सुद्धा फेरीवाले हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी झाली पाहिजे. या परिसरात वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ सतत सुरू असते. रस्ते अत्यंत अरुंद आहेत.मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय रस्त्यावर तर पदपथाची सुविधा नाहीच.ह्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले तर आहेतच परंतु दुकानदार सुद्धा आपल्या दुकानाच्या बाहेर रस्त्यावर माल विक्रीसाठी ठेवतात. बसेस सुद्धा चालवल्या जातात आणि त्या मुळे प्रचंड गर्दीच्या ह्या परिसरात कुर्ला आणि भांडुप रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती नक्कीच घडू शकते आणि पादचाऱ्यांना नाहक आपल्या जीवाला मुकावे लागू शकते.

Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर