वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक


मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करत दिमाखदार विजय नोंदवला. शेरफेन रदरफोर्डचे नाबाद अर्धशतक आणि गुडाकेश मोटीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडिजने १९६ धावांचे रक्षण करत इंग्लंडला १६६ धावांत गुंडाळले.


प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर शाई होप आणि ब्रँडन किंग स्वस्तात बाद झाल्याने विंडिजची २ बाद ८ अशी अवस्था बिकट झाली होती. मात्र, शेरफेन रदरफोर्डने ४२ चेंडूंत ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला जेसन होल्डरने (३३ धावा, १७ चेंडू) मोलाची साथ दिल्याने वेस्ट इंडीजने २० षटकांत ६ बाद १९६ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटनने २-२ बळी घेतले.


१९७ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. फिल सॉल्टने (३०) आक्रमक सुरुवात केली खरी, पण वेस्ट इंडीजच्या फिरकीपटूंनी सामन्यावर पकड मिळवली. गुडाकेश मोटीने ३३ धावांत ३ महत्त्वाचे बळी घेत इंग्लंडच्या मधल्या फळीचा कणा मोडला. रोस्टन चेसने २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. १९ व्या षटकात १६६ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद झाला.


सामन्याची गुणतालिका:
वेस्ट इंडीज: १९६/६ (२० षटके) - रदरफोर्ड ७६, रोस्टन चेस ३४; आदिल रशीद २/१६.
इंग्लंड: १६६/१० (१९ षटके) - सॅम करन ४३, जेकब बेथेल ३३; गुडाकेश मोटी ३/३३, रोस्टन चेस २/२९.

Comments
Add Comment

IPL 2026 : पहिल्या सामन्याआधीच RCB ला धक्का! 'हा' स्टार खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि

IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवरून आयपीएल २०२६ श्रीगणेशा! जाणून घ्या RCB vs SRH ची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ? मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू