BMC: मुंबईवर भाजपाचा महापौर विराजमान; मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौर पदी संजय घाडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या महापौर पदी अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर न केल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडत पिठासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनी भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होत खऱ्या अर्थाने महापालिकेवर भाजपचा भगवा डौलाने फडकला गेला आणि मागील चार दशकांचे भाजपचे स्वप्न साकार झाले.


मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापालिका सचिव यांनी विभागून दिलेल्या जागेत आपल्याला नगरसेवकांना ज्येष्ठते नुसार बसवून घेतल्यानंतर दुपारी प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली. भाजप आणि उबाठा यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू. मोदी मोदी घोषणा भाजपकडून तर त्यांना उबाठा कडून ठाकरे अशा घोषणा देण्यात आल्या..१२.०७ मिनिटाला सुरुवात झाली. वंदे मातरम् झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले.


या निवडणुकीला सुरुवात होतात उबाठा गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पिठासीन अधिकारी म्हणून नावाने अध्यादेश काढत आजवरच्या प्रथा आणि परंपरेला छेद दिल्याचा आरोप करत पिठासीन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण पिठासीन अधिकारी यांनी यावर उत्तर देत त्यांचा मुद्दा उडवून लावला. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी निवडणुकीला सुरुवात करत, एकही अर्ज न आल्याने महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने रितू तावडे यांची निवड महापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने संजय घाडी यांची निवड उपमहापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. या दोघांच्या निवडीनंतर सर्व सदस्यांनी बाके वाजवत त्यांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण