युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर

मुंबई : मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत प्रभावी नाट्यचळवळींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत. याच नाट्यप्रेमाने आणि आपल्याला लाभलेल्या नाट्यकलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंच थिएटरतर्फे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि नेदरलँड्समधूनही उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. या २ दिवसांमध्ये तब्बल १४ एकांकांची मेजवानी नाट्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. सर्व टीममध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सर्व कलाकारांनी उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमी माननीय विजय केंकरे यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने हे या स्पर्धेच्या परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत.


या एकांकिका स्पर्धेविषयी बोलताना अभिमंच थिएटरचे संस्थापक मिलिंद चव्हाण, प्रसाद सावंत आणि अमोल कोर्डे म्हणाले की , परदेशात वास्तव्यास असलेला मराठी समाज आपल्या भाषा, संस्कृती आणि कलेशी घट्ट नाते जपत आहे. त्याचाच एक भाग म्हणून युरोपमध्ये मराठी नाट्यकलेचा जागर घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही अभिमंच थिएटरच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. एकांकिका स्पर्धा या नेहमीच नाट्यरसिकांसाठी तसेच होतकरू कलाकारांसाठी एक महत्त्वाच व्यासपीठ ठरल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या एकांकिकांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिमंच गेली ७–८ वर्षे नाट्यकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक एकांकिका आणि दोन अंकांचे मराठी तसेच हिंदी नाट्यप्रयोग नेदरलँड्समध्ये अभिमंचने यशस्वीरित्या सादर केले आहेत, आणि नाट्यप्रेमींनी या प्रयोगांना नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला आहे.


स्पर्धेत विजयी ठरलेल्या पहिल्या तीन एकांकिकांना स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा विविध गटातील सात विजेत्यांनाही पुरस्कार मिळणार आहे. मराठी रंगभूमीची परंपरा जपत, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे युरोपमधील नव्या पिढीला मराठी नाट्यकलेशी जोडण्याची संधी मिळणार असून, मराठी संस्कृतीचा ठसा अधिक ठळकपणे उमटणार आहे.

Comments
Add Comment

धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ

बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना

Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत

Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ५८ वर्षांची असूनही माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा कट उघड, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई - हिंदी सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथे असलेल्या 'शेट्टी टॉवर' घरावर झालेल्या गोळीबार