छत्रपती संभाजीनगरात १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला.


दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इंग्रजी पेपरदरम्यान काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या असून, गैरप्रकार सिद्ध झाल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.


१९ जणांविरुद्ध कठोर कारवाई



या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व