मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरांची निवड पाहण्यासाठी प्रथमच बसले सभागृहाच्या गॅलरीत

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महापालिका सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो आहे. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक व वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.


मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


रितू तावडे यांच्याकडे एक अनुभवी व अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने सुरू केलेला मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. तसेच उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन महापालिकेच्या माध्यमातून चालविले जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना


मुंबईला अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले असल्याचा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार आहे. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.


महापालिका सभागृहात प्रथमच उपस्थित राहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री


महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात महापालिका सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले होते. सभागृहातील प्रेक्षा गॅलरीमध्ये बसून भाजपचे ४४ वर्षांनंतरचे स्वप्न साकार होताना पाहिले. प्रेक्षा गॅलरीमध्ये भाजपच्या महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर निवडीची प्रक्रिया याचि देही याचि डोळा पाहिली. अशाप्रकारे महापौर निवडीच्यावेळी महापालिका सभागृहात उपस्थित राहणारे पहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असून प्रेक्षा गॅलरीमध्ये बसूनही ही निवड प्रक्रिया न्याहाळणारेही पहिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरले

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा