Yamini Jadhav: महापौरपदापाठोपाठ यामिनी जाधव यांना उपमहापौरपदानेही दिली हुलकावणी

मुंबई: मुंबईच्या महापौरपदाची स्वप्ने आजवर जाधव कुटुंबाला अनेकदा दाखवली गेली. अनुसूचित जाती प्रवर्ग आल्याने यशवंत जाधव आणि त्यानंतर एकदा एस सी महिला प्रवर्ग आल्याने यामिनी जाधव यांना महापौरपदाची आस लागली होती. परंतु शिवसेनेने दुसऱ्याच नगरसेवकाला उमेदवार देत जाधव कुटुंबांची स्वप्ने उधळून लावली. परंतु यावेळी उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती पण तिथे जाधव यांच्याऐवजी संजय घाडी यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे उपमहापौरपदही जाधव कुटुंबाला मिळाले नाही. त्यामुळे महापौरपदापाठोपाठ आता उपमहापौरपदानेही यामिनी जाधव यांना हुलकावणी दिल्याचे दिसून आले आहे.


मुंबई महापालिकेत शिवसेनेचे २९ नगरसेवक आणि भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे आणि शिवसेनेच्यावतीने संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु शिवसेनेच्यावतीने उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यामिनी जाधव यांचे नाव उपमहापौरपदासाठी अग्रस्थानी होते . त्यामुळे पुन्हा एकदा जाधव कुटुंबावर अन्याय झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


यापूर्वी सन २००२मध्ये अनूसुचित जातीच्या महापौरपदाचे आरक्षण पडल्यानंतर यशवंत जाधव यांचे नाव होते, परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महादेव देवळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे यशवंत जाधव यांचे नाव मागे पडले. त्यानंतर सन २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये सुरुवातीला महिला एस सी प्रवर्गाकरता आरक्षण पडल्यानंतर यामिनी जाधव आणि स्नेहल आंबेकर यांची नावे चर्चेत होती. पण यामिनी जाधव यांना न देता तत्कालिन शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जाधव कुटुंबाचे दुसऱ्यांदा महापौर होण्याचे स्वप्न भंग पावले. त्यानंतर पुन्हा एकदा सन २०१९मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आल्याने तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष म्हणून यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणाला किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आणि त्या महापौर बनल्या. त्यामुळे तिसऱ्यांदा जाधव कुटुंबात जाणारे महापौर पद लांबणीवर पडले. त्यातच आता महापौर नाही तर उपमहापौर पद मिळेल अशी आशा असतानाच शिवसेनेने त्यांचा पत्ता कापून संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यामुळे महापौर पदानंतर आता उपमहापौर पदही त्यांच्या घरी जावू शकलेले नाही, हे दिसून आले आहे. यामिनी जाधव हे आक्रमक व्यक्तिमत्व असल्याने तसेच माजी आमदार असल्यामुळे सभागृहात त्यांची आवश्यकता लक्षात घेवून त्यांना उपमहापौर दिले नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे