Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार भावूक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याअगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या.



सुनेत्रा पवार भावूक:


सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सना मलिक शेख, आमदार सतिश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार आशुतोष काळे,आमदार हिरामण खोसकर, आमदार पंकज भुजबळ,माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : "अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास..."; अमेरिकेच्या धमकीला इराणचे स्पष्ट उत्तर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेत उमटले. ‘आम्ही

Plane - Fire Truck Accident : थेट विमानानेच दिली अग्निशमन दलाच्या गाडीला धडक, अनेक जण जखमी

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

काळा सोमवार, आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने

मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून युद्ध सुरू केले आहे. पश्चिम आशियात सुरू