IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड कप २०२६ अंतर्गत भारताविरुद्ध खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर माघार घेतली असून, ICCच्या मध्यस्थीनंतर १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्ध सामना न खेळण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बांग्लादेशने भारतात येण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने बांग्लादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती. यामुळे ICCसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली होती.


भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटचाहत्यांसाठी चुरशीची अटीतटीचा सामना , त्यामुळे या सामन्याची तिकिटांची किंमतही लाखो -करोडोंच्या'घरात जाते. त्यामुळे भारत–पाकिस्तान सामना रद्द झाल्यास स्पर्धेच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव ICCला झाल्यानंतर त्यांनी थेट संघर्षाऐवजी कूटनीतीचा मार्ग स्वीकारला. या प्रक्रियेत श्रीलंका, यूएई आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा सहभाग निर्णायक ठरला.


कोलंबो येथे सामना आयोजित असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानवर दबाव वाढवला. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही थेट पाकिस्तान संघाशी संवाद साधत सामना होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. याशिवाय, यूएई क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या व्यावसायिक हितांचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानला भूमिकेवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला.


दरम्यान, ज्यांच्यासाठी पाकिस्तान उभा राहिला होता, त्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भूमिका बदलत पाकिस्तानला सामना खेळण्याची विनंती केली. ICCकडून बांग्लादेशच्या हितांचे संरक्षण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पाकिस्तानाला माघार घ्यावीच लागली. या सर्व घडामोडीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर नमती भूमिका घेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास संमती दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.

Comments
Add Comment

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या

IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ

मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आयपीएल २०२६ च्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajsthan Royals) सामन्यात

IPL 2026 : रोमांचक मुकाबल्यात राजस्थानचा गुजरातवर ’रॉयल’ विजय

अहमदाबाद: रवी बिश्नोईच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. राजस्थानने

IPL 2026 Update, Pat Cummins : आयपीएल सोडून पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला

मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार, पॅट कमिन्स, आयपीएल २०२६ च्या मध्यातच संघ शिबिर सोडून आपल्या

IPL 2026 Hardik Pandya : हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात खेळत