Gold-Silver Rate: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात २५०० रुपयांची घसरण; चांदीचे दरही घसरले

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. मात्र आज मंगळवार १० फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईमध्ये ही घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यामुळे मंगळवारी सकाळी वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर १.६ टक्क्यांनी म्हणजेच २५०० रुपयांनी घसरुन १,५५,५४६ रुपयांवर आले आहेत. तर, चांदीच्या वायद्याचे दर ४ टक्क्यांनी घसरले आहे. चांदीच्या दरात ११,००० रुपयांनी घसरण होऊन आता हे दर २,५१,५४४ रुपयांवर पोहोचले आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये १.४ टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर ५००० डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. २९ जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याचे दर १० टक्क्यांनी घसरले आहेत. सिंगापूरमध्ये ८ वाजता स्पॉट गोल्ड ०.५ टक्क्यांनी घसरुन ५०३२.५३ डॉलर प्रति औंसवर आले आहेत. चांदीचे दर १.८ टक्के म्हणजे ८१.९२ डॉलरनं घसरले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती अस्थिर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५२,०७८ रुपये, IBJA च्या आकडेवारीनुसार, २३ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५१,४६९ रुपये, २२ कॅरेटची किंमत १,३९,३०३ रुपये आणि १८ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम १,१४,०५९ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक