Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढच्या अंडर १९ विश्वचषकाला मुकणार; आयसीसीकडून वैभवचा मोठा सन्मान

अंडर १९ विश्व चषक २०२६ भारतीय संघाने जिंकला. या चषकात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. आपल्या खेळीने त्याने क्रिकेट प्रेमींची मनं जिंकली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने १७५ धावा करून भारताला सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यास मदत केली. या स्पर्धेत तो सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र आता तो पुढचा अंडर १९ वर्ल्ड कप खेळू शकणार नाही आहे.


चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंशी दोन वर्षांत १७ वर्षांचा होईल. पुढील १९ वर्षांखालील विश्वचषक २०२८ मध्ये होणार आहे. मात्र बीसीसीआयच्या नियमांमुळे, वैभव त्या विश्वचषकात खेळू शकणार नाही. २०१६ मध्ये, बीसीसीआयने एक नियम लागू केला ज्यामध्ये कोणताही खेळाडू १९ वर्षांखालील विश्वचषकात एकापेक्षा जास्त वेळा खेळू शकत नाही. या नियमाच्या वेळी, राहुल द्रविड भारतीय १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. अधिकाधिक तरुण खेळाडूंना ज्युनियर स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळावा यासाठी बीसीसीआयने हा नियम केला आहे.





वैभव सूर्यवंशीचा मोठा सन्मान:


विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात वैभवने केलेल्या १७५ धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंडसमोर ४१२ धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यानंतर भारताने इंग्लंडला ३११ रन्सवर ऑलआऊट करत सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला. वैभव सूर्यवंशीला त्याने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी कडून वैभवाची थेट मुख्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे