शुभारंभ शुभदिनी, नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

मुंबई : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.


माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत, गणरायाच्या चरणी त्यांनी आपल्या आगामी कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण त्यांच्या नव्या प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखालील ह्या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.


अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून मनवा हिने आजवर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. 'पोर बाजार' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन, 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'सरस्वती' या मालिकांची तसेच वेबसिरीजची निर्मिती केली आहे.


‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब', ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटात तसेच हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटासोबत ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली आहे.


या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.” ही नवीन कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी बातमी ठरणार आहे!

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत