पंजाबमध्ये लॉ कॉलेजच्या वर्गात हत्या, विद्यार्थ्याने झाडल्या गोळ्या

पंजाब : लॉ कॉलेज मधील एका हत्याकांडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर वर्गात गोळीबार झाल्यामुळे कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे.



नेमकं घडलं काय ?


मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे नाव संदीप कौर असे आहे तर गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव प्रिन्स राज असे आहे. हे दोघेही लॉ कॉलेज यामध्ये पहिल्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी आहेत. सकाळच्या सुमारास लेक्चर सुरू होण्यापूर्वी काही तास आधी कॉलेजच्या एका वर्गात प्रिन्स राजने संदीप कौर या विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळ्या घालून तिची हत्या केली.


विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर भर वर्गात गोळ्या झाडल्या. त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात देखील गोळ्या झाडल्या. या गोळीबारात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यु असून आरोपी विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण लॉ कॉलेज सील केला आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी