Shirur Panchayat Samiti Election Result 2026: कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव; भाजपच्या मनीषा पाचंगेंनी मारली बाजी

मुंबई: समाज माध्यमावर प्रचंड फेमस असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आजवर त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. परंतु, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली आहे. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना ३०० मतांनी पराभूत केले.


पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही.


दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे २०, शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, ठाकरे गटाचे २ आणि शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. पुण्यात एकही मोठी सभा झाली नव्हती. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.

Comments
Add Comment

धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ

बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना

Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत

Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव