मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले तौरल इंडिया-सुपा प्लांटचे उदघाटन

अहिल्यानगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्र या प्रगतीला गती देत आहे. तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. तौरल इंडिया–सुपा प्लांट प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे.


आपल्या सरकारने दावोसमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ११,५१९ कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर उत्तर महाराष्ट्रात जवळपास ७५ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.


यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल