America Iran War: 'अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर...'; इराणची अमेरिकेला धमकी

America Iran War: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका - इराण या दोन देशांमध्ये वाद सुरु आहेत. मात्र त्यांच्यातला हा वाद आता अधिक गंभीर होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणकडून थेट धमकी देण्यात आली आहे.


अमेरिकेने इराणवर नव्याने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे चिडलेल्या इराणने थेट वॉशिंग्टनला म्हणजेच अप्रत्यक्ष ट्रम्प यांना युद्धाची धमकी दिली आहे. "जर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे धाडस केले, तर मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन सैन्य तळांना आम्ही उद्ध्वस्त करू," असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे. इराणच्या या धमकीमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.



अमेरिकन सैन्यच केवळ आमचं लक्ष: 


विशेष म्हणजे, ओमानच्या मध्यस्थीने शुक्रवारी (६ फेब्रुवारी) दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. अणू कराराबाबत अप्रत्यक्ष चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासांत अराधची यांनी हे आक्रमक विधान केल्याने चर्चेच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अराघची यांनी स्पष्ट केले की, आमचा हल्ला त्या देशांवर नसेल जिथे अमेरिकन तळ आहेत, तर आमचे लक्ष्य केवळ अमेरिकन सैन्य असेल.



अमेरिकेची आक्रमक भूमिका आम्हाला मान्य नाही:


अब्बास अराघची यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अमेरिकेसोबतच्या पुढील चर्चेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात चर्चेचे संकेत दिले आहेत. चर्चा लवकर व्हावी, असे दोन्ही देशांना वाटते, पण अमेरिकेची आक्रमक भूमिका आम्हाला मान्य नाही."



काय आहे तणावाचे मुख्य कारण?


इराण अणू बॉम्ब बनवत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. ट्रम्प सरकारने इराणच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी करण्यासाठी नवे निर्बंध लादले आहेत. आखाती समद्रात अमेरिकेने यद्धनौका पाठवल्याने इराण बिथरला.

Comments
Add Comment

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा

Middle East War : इराणचा पाठिंबा असो किंवा नसो, अमेरिका होर्मुज खुला करेल - ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज

US-Iran Peace Talks : गालिबाफ यांनी अनोख्या श्रद्धांजलीने अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

इस्लामाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला पूर्णविराम देण्यासाठी कूटनीतिक मार्ग शोधण्याच्या उद्देशाने

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या