आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून विविध मार्गावर जादा १३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. १० फेब्रुवारी पर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात कुडाळ - आंगणेवाडी १५, वेंगुर्ला आगारासाठी कुडाळ - आंगणेवाडी १०, कसाल - हिवाळे - आंगणेवाडी ४, कसाल - खोटले - आंगणेवाडी ५, निरुखे - पांग्रड आंगणेवाडी ३, पणदूर - ओरोस आंगणेवाडी १ अशा कुडाळ आगारातून ३८ बसेस सोडण्यात येणार आहेत.


मालवण आगारातून मालवण - आंगणेवाडी १०, सावंतवाडी आगारासाठी मालवण - आंगणेवाडी १३, देवबाग तारकर्ली - आंगणेवाडी २, आनंदव्हाळ आंगणेवाडी, डांगमोडे - आंगणेवाडी, सर्जेकोट - आंगणेवाडी, मालोंड - आंगणेवाडी, देवली - वायरी - आंगणेवाडी, वराड - आंगणेवाडी, तळगाव - सुकळवाड - आंगणेवाडी, तिरवडे आंगणेवाडी, कट्टा आंगणेवाडी, धामापूर - आंगणेवाडी अशी प्रत्येकी एक बस, मसुरे आंगणेवाडी ४, चौके आंगणेवाडी २ अशा मालवण आगारातून ४१ बसेस सोडण्यात येतील.


कणकवली आगारातून २६, विजयदुर्ग आगारासाठी ५, सावंतवाडी आगारासाठी १०, असगणी - असरोंडी - आंगणेवाडी २ अशा ४३ बसेस कणकवली आगारातून सोडण्यात येणार आहेत.


देवगड आगारातून देवगड - आंगणेवाडी, हिंदळे - मुणगे - आंगणेवाडी प्रत्येकी २, आचरा - आंगणेवाडी ३, तोंडवली - तळाशील - आंगणेवाडी, कुडोपी आंगणेवाडी, आरे आंगणेवाडी, आचरा चिंदर बांदिवडे - आंगणेवाडी अशी प्रत्येकी १ अशा ११ बसेस देवगड आगारातून, तर पाट - परूळे - आंगणेवाडी आडारीमार्गे २ अशा वेंगुर्ला आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Kerala Assembly Election : केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर

भाजपने २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ११

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

Iran-US-Israel War : अमेरिका लष्करी कारवाया कमी करणार; मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दावा

मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. युद्धाचा चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत

Iran-US-Israel War : आतापर्यंत २,०००हून अधिक मृत्यू, १६५ लहान मुलींचाही बळी

मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्य नागरिकांच्या