Palghar: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड; औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी, मुद्देमाल जप्त

पालघर: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा हा प्रकार समोर असून याप्रकरणी तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २६.२८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २६ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई -अहमदाबाद महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.


औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी

 

महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टाटा टेम्पोमधून औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हिमाचल-पंजाब ढाबा परिसरात टेम्पोची तपासणी केली असता, ९ लाख २८ हजार ३२० रुपयांची दारू आढळून आली. वाहनासह एकूण २६.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दरम्यान या प्रकरणी चालक शिवेंद्रकुमार लालबाबु ठाकुर याला अटक करण्यात आली आहे. तसेच तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी