Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कोणतेही सोहळे, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार नाहीत. तसेच शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत.


त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने त्या दिवशी कोणत्याही सोहळ्याचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन न करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत, असे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध