Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

जालना: जालन्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते १६ जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश असून सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे


जालन्यात फूड पॉइझनिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे.


नेमकं घडलं काय?



टट्टूपुरा भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरी विक्रीसाठी गाडा लावला होता. परिसरातील लहान मुलांसह काही नागरिकांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांना अशक्तपणा जाणवू लागला. त्रास वाढत गेल्याने रात्री उशिरा बाधित नागरिकांना शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


प्राथमिक तपासणीत पाणीपुरी खाल्ल्यामुळेच फूड पॉइझनिंग झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात असून महापालिका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला