लग्नाचं आमंत्रण देत असलेल्या कुटुंबाला ऑडीने चिरडलं, ३ जणांचा मृत्यू

रेवा : मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यात ऑडी कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी एका ठिकाणी जात होते. मृतांची ओळख पटली आहे. भागवत विश्वकर्मा (५५), त्यांचा मुलगा शिवम आणि शीतल विश्वकर्मा अशी मृतांची नावं आहेत.


भागवत यांच्या मोठ्या मुलाचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी होणार होते. याच लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी विश्वकर्मा कुटुंब एका ठिकाणी जात होतं त्यावेळी ऑडीने उडवलं. घरापासून फक्त २ किमी अंतरावर रेवा-प्रयागराज महामार्गावरील कोस्टा गावाजवळ अपघात झाला.


प्रयागराजकडून येणाऱ्या एका भरधाव ऑडी कारने दुचाकीला उडवले. यात विश्वकर्मा कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. अपघातात बाईक चेंदामेंदा झाली. पोलिसांनी अपघात प्रकरणी ऑडी कारच्या चालकाला पकडले आहे.


भागवत आणि शिवम हे चाचईचे रहिवासी होते, तर शीतल जवळच्या राथरा येथे वास्तव्यास होती. या सर्वांचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. नातलगांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. विश्वकर्मा कुटुंबियांचे नातलग संजय गांधी रुग्णालयात पोहोचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

दिल्ली: मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील