Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता वा लोकप्रियतेसाठी काम करीत नाही! - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संघ कोणाच्या विरोधात नाही, संघकार्य हे राष्ट्रासाठी


मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेच्या विरोधात कार्य करीत नसून राष्ट्रनिर्मितीसाठीच आपले कार्य करतो. संघ हे ना अर्धसैनिक संघटन आहे, ना सत्ता किंवा लोकप्रियतेच्या मागे धावणारे. संघाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असून ते समजून घेण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात”, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी (७ फेब्रुवारी) केले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात्रा के १०० वर्ष -नए क्षितिज’ या कार्यक्रमांतर्गत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला. वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेत आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, चित्रपटसृष्टी, गृहनिर्माण संस्था आदी विविध क्षेत्रांतील सुमारे ८०० मान्यवर सहभागी झाले होते.


सरसंघचालक म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाच्या विरोधात नाही. आम्ही कोणाचाही विरोध न करता आपले कार्य करतो. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा उल्लेख करत सांगितले की, इंग्रजांनी काँग्रेसची स्थापना ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ म्हणून केली होती; मात्र भारतीयांनी तिला स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी साधन बनवले. संघाचे कार्य अनोखे आहे आणि आमच्या माहितीनुसार असे कार्य जगात इतरत्र कुठेही दिसून येत नाही. आज आम्ही हे प्रत्यक्ष अनुभवत आहोत, कारण भारतासह परदेशातूनही लोक संघाचे कार्य पाहण्यासाठी येतात. पाचही खंडांतील लोक येथे येऊन संघाच्या उपक्रमांचा अभ्यास करतात आणि अनेक प्रश्न विचारतात.


ते म्हणाले, आफ्रिका, युरोप, अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया किंवा मध्य पूर्व कुठूनही आले असले तरी शेवटी प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो. ही कार्यपद्धती युवा पिढीसाठी किती उपयुक्त आहे, आणि कदाचित त्यांच्या देशाच्या इतिहासातही गौतम बुद्धांनंतर असा अखिल भारतीय प्रयत्न झाला नसेल, असे त्यांनी नमूद केले.



संघकार्य स्वतःसाठी नाही, राष्ट्रासाठी


- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, अनेक जण संघाची तुलना इतर चळवळी, संस्था, संघटना किंवा राजकीय पक्षांशी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र संघाला वरवरून किंवा दूरून पाहिल्यास गैरसमज निर्माण होतात. लोक संघाचे कार्यक्रम, संचलन आणि विविध उपक्रम पाहतात; परंतु संघ हे अर्धसैनिक संघटन नाही. स्वयंसेवक दंडप्रशिक्षण शिकतात, मात्र संघ म्हणजे देशव्यापी कुस्तीचा आखाडा नव्हे.
- संघात भारतीय परंपरेवर आधारित संगीताच्या धून वाजवल्या जातात आणि वैयक्तिक तसेच सामूहिक गीतांचे गायन केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शंभर वर्षांनंतर पुन्हा एकदा आम्ही सांगत आहोत, की संघ म्हणजे काय? संघाचे कार्य स्वतःसाठी नसून संपूर्ण राष्ट्रासाठी आहे.
- सरसंघचालकनी स्पष्ट केले की, संघाची स्थापना कोणत्याही इतर संघटनेशी स्पर्धा म्हणून झालेली नाही, तसेच एखाद्या विशिष्ट परिस्थितीच्या प्रतिक्रियेतूनही संघ उभा राहिलेला नाही. संघाने कधीही कोणाच्या विरोधात कार्य केलेले नाही. संघ लोकप्रियता किंवा सत्तेची इच्छा बाळगत नाही, असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत