Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी यावर्षी परीक्षेसाठी नवीन नियमावली केली असून ते नियम पळाले नही तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.


नवीन नियमांनुसार; परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच एका विद्यार्थी सोबत दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल सेंटर, इंटरनेट सुविधा, आणि कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या १०० मीटरच्या अंतरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी साधने जवळ बाळगणे किंवा वापरण्यावर पूर्णपणे मनाई आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात