Mumbai Local : वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; तिन्ही मार्गांवर लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी उद्या, रविवारी मुंबईच्या तिन्ही मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरही सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, धावणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक पाहूनच आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक


मध्य रेल्वेने उद्या, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या ५ तासांच्या कालावधीत रेल्वे रुळांची आणि तांत्रिक कामांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. या ब्लॉकमुळे धीम्या (Local) मार्गावरील सर्व फेऱ्या जलद (Fast) मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील. प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



पनवेल-वाशी दरम्यान हार्बरचा ५ तासांचा ब्लॉक


उद्या रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्स-हार्बर अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, खारकोपर-उरण मार्गावरील वाहतूक मात्र आपल्या निर्धारित वेळापत्रकानुसारच सुरू राहील, त्यामुळे तिथल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.



पश्चिम रेल्वेवर उद्या 'जम्बो ब्लॉक


पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी उद्याचा रविवार त्रासाचा ठरणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ब्लॉकचा सर्वात मोठा फटका विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकातील प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही स्थानकांवर जलद मार्गाचे फलाट उपलब्ध नसल्याने, ब्लॉक वेळेत येथे कोणतीही लोकल थांबणार नाही. या स्थानकांतील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था म्हणून हार्बर रेल्वेच्या लोकलचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. या तांत्रिक कामामुळे पश्चिम रेल्वेच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या विलंबाने धावणार आहेत.



कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर 'बुलडोझर' फिरणार


मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील जमिनी मोकळ्या करण्यासाठी कंबर कसली असून, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गिकेलगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बगा बडवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने या भागातील तब्बल ३ हजार १५४ झोपडीधारकांना अधिकृतपणे नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे या परिसरात एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत रेल्वे मार्गालगत असलेली सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवली जातील. रेल्वेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील झोपडीधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे मार्गाच्या सुरक्षा आणि विस्तारीकरणासाठी ही जागा मोकळी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील