जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन


पुणे : शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.


जुन्नरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दुर्वेवी घटनेत अफसर इनामदार यांची दोन्ही मुले खेळत असताना शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण जुन्नर तालुका हळहळला, त्याच वेळी १ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जुन्नर येथे गेले असता स्थानिक शिवसेना नगरसेवक मयुर महाबरे यांनी ही घटना आमदार शरद सोनवणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारातून वेळात वेळ काढून ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.


त्यानुसार काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक नगरसेवक मयुर महाबरे आणि स्थानिक शिवसैनिकांनी ईनामदार कुटुंबाची भेट घेऊन पाच लाखांची ही मदत त्यांना सुपुर्द केली.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून स्वतःची मुले गमावण्याचे दुःख काय असते ते मला चांगले माहिती आहे, गेलेली व्यक्ती परत आणता येणे शक्य नसले तरीही या दुःखातून सावरण्यासाठी शिवसेना आपल्याला लागेल ती सर्व मदत नक्की करेल असे सांगितले. आपली झालेली हानी भरून काढता येणे अशक्य असले, तरीही या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला मदत पाठवली असून ती आपण मोठ्या मनाने स्वीकारावी अशी विनंती शिंदे यांनी केली. दिल्या हाकेला धावणारी आणि दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. धर्माच्या भिंती ओलांडत एका बापाने दुसऱ्या बापाला दिलेला शब्द पाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यातील संवेदनशीलपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०