"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. सुमारे पावणे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा राजकीय हालचालींसाठी खुले झाले आहे. मुंबई महापालिका गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ विधिवत वस्तू पूजन करून पार पडले.

महापालिका पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पारंपारिक मराठी पेहराव केला होता. कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आणि विधिवत पूजन करून नवीन सत्ताकाळाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या आगामी काळातील वाटचालीचा हा नवा अध्याय मानला जात आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

या प्रसंगी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यावर "मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात" असा संदेश देण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या कार्यालयातूनच आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत भाजपचे नेतृत्व करणारे आणि ज्यांच्या नेतृत्वाची ८९ नगरसेवक निवडून आले. ते मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. मुंबई अध्यक्ष अमित साटम हे नव्या कार्यालयाच्या पूजेला उपस्थित न राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.
Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध