Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.


पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.


यावेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे रेखाचित्र, स्वतः मुलांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि त्रिपुरातील नारळाच्या लाकडापासून बनवलेली सतार, सेंद्रिय चहा (यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चहा विक्रेत्याला चहा देत आहेत) आणि आसाममधील गमछा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.





अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची:


परीक्षा पे चर्चा २०२६ या पर्वातून अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ५ कानमंत्र दिले आहेत. तसेच परीक्षेला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही परीक्षेत तुमची सर्वोत्तम कामगिरी साध्य करू शकता.



पंतप्रधान मोदींनी दिले विद्यार्थ्यांना हे ५ कानमंत्र


- परीक्षांना उत्सवासारखे मान द्या.



- इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा.



- तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करा.



- कठीण कामांना प्रथम सामोरे जा.



- पोपट नाही तर परीक्षा योद्धा बना.

Comments
Add Comment

भारतीय सैनिकांना मिळाल्या शत्रूला दणका देणार प्रहार लाईट मशिन गन

ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी