Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी होणार असून नाशिकवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. नाशिकमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर विराजमान होणार आहे. या सत्तासमीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि राज ठाकरेंच्या मनसेने देखील भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसे अशा चार पक्षांची महासत्ता पाहायला मिळणार आहे.



दुसरीकडे, संख्याबळ नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे, ज्यामुळे आता नाशिकला हिमगौरी आडके यांच्या रूपाने भाजपचा महापौर आणि विलास शिंदे यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बिनविरोध मिळणार आहे. आज सकाळी महापालिकेत निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपचे नगरसेवक मोठ्या उत्साहात दाखल होत आहेत. विशेषतः भाजपच्या महिला नगरसेविकांनी पारंपरिक पोशाख आणि भगवे फेटे परिधान करून महापालिकेत प्रवेश केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे त्यांचा 'विरोधी पक्षनेता' होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात नाशिकला नवीन महापौर आणि उपमहापौर अधिकृतपणे मिळणार आहेत.


गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर आज संपुष्टात येत असून, नाशिकला नवा लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महापालिकेच्या सभागृहाचे रूप पूर्णपणे पालटले आहे. नूतनीकरण केलेली आसनव्यवस्था, आकर्षक रंगरंगोटी आणि फुलांच्या सजावटीसह सभागृहाला एखाद्या वधूसारखा नवा साज देण्यात आला आहे. पुढच्या काही तासांतच नवीन महापौरांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार असून, या सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने चोख तयारी केली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकचा कारभार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार असल्याने नाशिककरांमध्ये आणि राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात नव्या महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नाशिकमध्ये 'महायुती'चा जल्लोष पाहायला मिळेल.

Comments
Add Comment

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे छापे

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले.

NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट मुंबई : सिंधुदुर्ग,

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार

Pandharpur Acid attack : धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार

- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संताप राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत