Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा येत्या काळात सलग तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाला दुजोरा दिला आहे आणि लवकरच याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.


नवीन मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सुरुवातीला हे काम सहा महिने चालणार होते. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने हे नियोजन सहा महिन्यांवर आणले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 964.84 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे.


या ब्लॉकमुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. सध्या गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 88, तर वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान 106 लोकल फेऱ्या धावतात. दररोज सुमारे 3.62 लाख प्रवासी या मार्गावरून पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेकडे (हार्बर मार्गे) प्रवास करतात. ब्लॉक काळात वांद्रे-सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा रेल्वेचा विचार आहे, पण गोरेगाव ते वांद्रे दरम्यान सेवा पूर्णपणे खंडित असेल.


प्रकल्प रखडण्यामागे काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील 155 कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप एमएमआरडीएकडून पूर्ण झालेले नाही. 2017-18 मध्ये 10 कोटी खर्चून उभारलेली 5 वी मार्गिका स्थानिक विरोधामुळे कार्यान्वित होऊ शकली नाही. जर ती तेव्हा सुरू झाली असती, तर आज पूल पाडण्याची आणि सेवा बंद करण्याची वेळ आली नसती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


रेल्वेच्या मते, हा तीन महिन्यांचा त्रास सहन केल्यास भविष्यात मोठे फायदे मिळू शकतील. पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते बोरीवली आणि विरार दरम्यान लोकल फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावतील, ज्यामुळे लोकलच्या विलंबाचा प्रश्न मार्गी लागेल.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन