बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे कारवाईचे आदेश

मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे. राज्यभरातील सर्व कीटकनाशक निरीक्षकांना ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ या ब्रँड नावाने विकल्या जाणाऱ्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विक्रीविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. सरकारने कीटकनाशक कायदा, १९६८ आणि कीटकनाशक नियम, १९७१ यांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर छापे घालणे, माल जप्त करणे आणि खटला दाखल करणे अशी कारवाई सरकार करू शकते.


भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर व्हावा यासाठी काम करणाऱ्या, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) या संस्थेने सरकारच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून HICA ही प्रशासनाच्या संपर्कात होती. मंजुरी नसलेली रसायने वापरणाऱ्या डास प्रतिबंधक अगरबत्तींबाबत तिने संबंधित यंत्रणांना वेळोवेळी सतर्क केले होते.


यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये ‘स्लीप वेल’ आणि मुंबईमध्ये ‘कम्फर्ट’ या डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या तपासण्या प्रयोगशाळांत करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांत बेकायदेशीर आणि मंजुरी नसलेली कीटकनाशके आढळली होती. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि कारवाईही करण्यात आली. मुंबईत या संदर्भात अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले आणि ‘कम्फर्ट डास प्रतिबंधक अगरबत्ती’वर बंदी घालण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत महाराष्ट्र सरकारने आपली कारवाई राज्यव्यापी पातळीवर वाढवली असून, दोन्ही उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी नवीन परिपत्रक जारी केले आहे.


महाराष्ट्राच्या कृषी संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना आणि कीटकनाशक निरीक्षकांना हे नवे परिपत्रक पाठवले आहे. ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ या डास प्रतिबंधक अगरबत्तींची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर आणि वितरकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार, छापे घालणे, बेकायदेशीर साठा जप्त करणे, तसेच केलेल्या सर्व कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर करणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सरकारने दुकानदार आणि वितरकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नोंदणी नसलेल्या कीटकनाशक उत्पादनांची विक्री किंवा वितरण करणे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते. या उत्पादनांचा साठा ठेवणे आणि विक्री करणे तातडीने थांबवण्याचे आदेश सर्व विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.


‘होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन’चे (HICA) मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “कम्फर्ट आणि स्लीप वेल यांसारख्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींबाबत महाराष्ट्र सरकारने वेळेत आणि ठोस कारवाई केली, याचे आम्ही मनापासून कौतुक करतो. अगरबत्तीच्या स्वरूपात डासप्रतिबंधक म्हणून बेकायदेशीर आणि मंजुरी नसलेली रसायने वापरणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा उत्पादनांची विक्री कोणतीही परवानगी न घेता जाणीवपूर्वक केली जाते आणि ग्राहकांना ती सुरक्षित असल्याचा चुकीचा समज करून दिला जातो. बनावट डास प्रतिबंधक अगरबत्त्या नकळत खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई आहे. बेकायदेशीर उत्पादन करणाऱ्यांना आणि त्यांच्या वितरणाला मदत करणाऱ्यांना अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारने यातून दिला आहे. इतर सर्व राज्यांमध्येदेखील अशी सातत्यपूर्ण कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करतो. तसेच, ग्राहकांनी फक्त वैध सीआयबीआरसी नोंदणी क्रमांक असलेलीच डासप्रतिबंधक उत्पादने खरेदी करावीत, असा सल्ला देतो.”


‘HICA’ने किरकोळ विक्रेते आणि वितरक यांना सर्व नियमांचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांनी पॅकेजिंगवर वैध सीआयआर क्रमांक असलेलीच डासप्रतिबंधक उत्पादने खरेदी करावीत, असेही संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि