BMC Mayor Election 2026: शरद पवार शिंदेंना पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.



शरद पवार यांचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष पाठिंबा:


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अजित रावराणे यांच्याकडून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला अशा चर्चा राजकीय वर्तुळात पसरू लागल्या आहेत.


भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाकडूनही आपल्या नगरसेवकांना मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ८ फेब्रुवारीला रविवार असल्याने काही नगरसेवक जत्रेसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. महापौर निवडणूक तोंडावर असताना ‘संख्या’ अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे.



शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार:


उद्या म्हणजेच शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर बुधवार ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटं आधी असणार आहे.



८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी :


सोमवार २ फेब्रुवारी रोजी कोकण भवनात भाजपच्या एकूण ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी झाली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी झाली. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

Israel US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; 'इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला, उशीर होण्यापूर्वी इराणने...'

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. आपल्या 'ट्रुथ सोशल'