"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. जवळपास ३-४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा राजकीय हालचालींसाठी खुले झाले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम आणि गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.


उद्घाटन कार्यक्रमात भाजपचा 'मराठी बाणा' दिसून आला. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पारंपारिक मराठी पेहराव केला होता. कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आणि विधिवत पूजन करून नवीन सत्ताकाळाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या आगामी काळातील वाटचालीचा हा नवा अध्याय मानला जात आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.


या प्रसंगी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यावर "मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात" असा संदेश देण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.


नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या कार्यालयातूनच आखण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने