संत निळोबाराय

नाही त्या उरले दुजे ने कृष्णवीण।
बाह्य अंतःकरण कृष्ण झाला ॥
जीवाचाही जीव शिवाचाही शिव ।
देही देहभान कृष्ण झाला ॥
शब्दां शब्दविता बोधा बोधविता ।
चित्रा चेतविता कृष्ण झाला ॥
निळा म्हणे कृष्णे केले कृष्णाकार ।
सबाहय अंतर रंगविले ॥
- संत निळोबाराय


संत निळोबाराय हे संत तुकारामांचे शिष्य. तुकाराम महाराजांचे अनन्य भक्त. संत तुकारामांप्रमाणे त्यांची अभंगरचना प्रासादिक, निर्भिड आणि मर्मभेदी आहे. या अभंगात त्यांनी आपल्या कृष्णमय झालेल्या अनुभूतीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'आता कृष्ण रंगाविना दुसरे काहीच उरले नाही. अंतर्बाह्य कृष्णानेच व्यापले आहे. जीवाचा जीव आणि शिवाचा शिव असे अवघे कृष्णरूपच आहे. देहाचे देहभावही कृष्णरूप झाले आहेत. शब्दांना शब्दरूप देणारे, बोधालाही बोध करणारे, मनाला चैतन्य देणारे असे जे आहे ते कृष्णरूपच आहे. कृष्णाच्या नामाने, त्याच्या ध्यासाने आपण कृष्णच होतो. अंतर्बाह्य कृष्णरंगात रंगून जातो.


संत निळोबांनी रात्रंदिन कृष्णनामाचा आणि कृष्णरूपाचा ध्यास घेतला होता. तनामनात, विचारात, ध्यानीमनी, आतबाहेर कृष्णरंगच दाटून राहिला होता. अवधे अस्तित्व त्या सावळ्याच्या स्वरूपी विरघळून गेले होते. कृष्णाकार झाले होते. જળ 'कृष्ण द्यावा कृष्ण घ्यावा। अवघा ल्यावा कृष्णरंग' ॥ अशी त्यांची अवस्था झाली होती.


कृष्ण म्हटलं की आठवते त्याची सावली, शामल तनू, त्याची चराचराला मुग्ध करणारी बासरी आणि डोईवर खोवलेले आनंदरूप मोरपीस. यमुनेकाठचा रासरंग म्हणजे आनंदाचा उत्सव. दुःखाचे ताणतणाव विसरुन संगीताच्या तन्मय लयीत आयुष्याचा आनंदाचा, चैतन्याचा अनुभव घ्यावा, हे कृष्णाचे आयुष्यविषयक 'तत्वज्ञान'. कृष्ण शब्दांपेक्षा आपल्याशी कृतीतून अधिक बोलतो, आयुष्यातील दुःखाला छेद देत आयुष्यात पर्व उभे करणे हे कृष्टनीतीचे तत्व आहे. મંતન્યાયા


कृष्ण म्हणजे न्यायाला संरक्षण, कृष्ण म्हणजे उन्मत्त शक्तींना शासन, कृष्ण म्हणजे लोककल्याणासाठी असलेले सिंहासन. कृष्ण म्हणने अंधाराचा अंत. कृष्ण म्हणजे प्रकाशाचे तेजोमय पर्वः.


संत निळोबाराय कृष्णरंगात एकरूप झाले आहेत. सारे काही कृष्णरंगाचा लयीत रंगून गेले आहे, यमुनेचा पाण्यासारखा कृष्णरंग मनात प्रवाहित झाला आहे.


कृष्णरंगाची ही धून आपल्यालाही आनंदाची अनुभूती देते, शब्दांचे शब्दपण, जीवाचे जीवपण, बोधाचे बोधपण ज्यात समरस होते अशा कृष्णपणाची अनुभूती आपल्या जाणिवांना समृद्ध करते.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा