Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद'च्या टॉप कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका गुहेत अडकलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा बुधवारी (४ फेब्रुवारी) खात्मा करण्यात आला. दुपारी १२ वाजता सैन्याने गुहेत घुसखोरी केली तेव्हा अनेक मोठे स्फोट ऐकू आले.


अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक रुबानी उर्फ ​​अबू माविया होता, जो जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक टॉप कमांडर होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सक्रिय होता.



भारतीय सैन्याचे ऑपरेशन "किया" यशस्वी:


मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता रामनगर-बसंतगड परिसरातील वरच्या भागात सैन्याकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत असताना, लष्कराने, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी दहशतवाद्यांचा माग काढला. त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. तब्बल २० तासांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनला सैन्याने "किया" (operation "KIA") असे नाव दिले आणि ते संपल्याचे सांगितले.


एका दहशतवाद्याचा मृतदेह गुहेच्या तोंडाशी आढळला, तर दुसऱ्याचा मृतदेह गुहेच्या आत खोलवर आढळला.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या