Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका हक्काचा शॉरमा स्टॉल मिळवून दिला आहे. 4 फेब्रुवारीला स्वत: अविनाश जाधव यांनी या स्टॉलचे उद्घाटन केले आहे. अखेरीस शॉरमा गर्लच्या व्यवसायाला सुरवात…. अशा आशयाची पोस्ट अविनाश जाधव यांनी शेअर केली आहे. तसेच 'विकासाचे नाव अविनाश जाधव खूप मदत केली तुम्ही, धन्यवाद. राज साहेबांचे खुप आभारी आहे' अशा आशयाची पोस्ट करत एकता सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे एकता सावंत यांच्या मागणीनुसार या शॉरमा स्टॉलवर राज ठाकरेंचा देखील फोटो लावण्यात आला आहे. सध्या समाज माध्यमांमध्ये ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.


डोंबिवलीत पालिककडून काही दिवसांपूर्वी शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिकेवर कारवाई करण्यात आली. यावेळी बोलताना, सावंत यांनी बोलताना पालिका प्रशासनावर आरोप केले होते की, माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा ही कारवाई केली. शिवाय पालिकेकडून फक्त माझ्याच स्टॉलवर कारवाई केली जात असून इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे त्यांनी सांगितले. एकता सावंत या रिलस्टार असून त्यांच्या रिल्सला मिलियनमध्ये व्हिव्ह मिळतात. तर त्यांचे लाखापेक्षा अधिक फॉलोवर आहेत.


दरम्यान, या कारवाई संदर्भात सावंत यांनी एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर या इंस्टाग्राम पोस्टची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले आणि आपण एकता सावंत यांच्या पाठीशी उभे असल्याची भूमिका त्यांनी घेतली. तर एकता सावंत यांच्याबाबत घडलेल्या प्रकारानंतर अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले होते.





एकता सावंत यांच्या टपरीवर राज ठाकरेंचा फोटो


 

अविनाश जाधव भेटायला गेले तेव्हा एकता म्हणाल्या की, "दादा मला येथे टपरी टाकून द्या आणि त्या टपरीवर राज साहेबांचा फोटो टाकून द्या. मी राज साहेबांना मनातून वोट करते, तर त्यांचा फोटो गाडीवर पाहिजे. मग मला कोणीच येथून हटवू शकत नाही" तर यावर उत्तर देताना अविनाश जाधव म्हणाले की, मला राज साहेबांनीच तुला भेटायला पाठवले आहे. तुझा काय प्रॉब्लेम झाला आहे ते आपण पाहून घेऊ. असा विश्वास अविनाश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला होता, या सर्व घडामोडीनंतर सावंत यांना हक्काचं शॉरमा स्टॉल मिळालं. यानंतर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे आभार मानले आहे.


Comments
Add Comment

Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध

Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक

Bmc News, Vashi Gateway : वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव प्रतिष्ठानने केली महापौरांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या संकल्पनेतून मुंबईतील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि घड्याळ बसण्याचे काम हाती

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच