महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्षाला नगरसेवक संख्येनुसार पक्ष कार्यालय वितरीत करण्यात येत असून आपले जुने कार्यालय कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. भाजपचे नगरसेवक आपल्या जुन्याच जागेवरील नुतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा जाणार आहेत. या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे वास्तू शांती तथा पुजन करून याचे उद्घाटन तथा प्रवेश होणार आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना आपल्या हक्काचे कार्यालय मिळाले असले तरी बाकीच्या पक्षांना रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण झाल्यानंतरच पक्ष कार्यालये वितरीत होणार आहेत.


मुंबई महापालिकेने निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या गणसंख्येनुसार संबंधित राजकीय पक्षांना छोट्या आणि मोठ्या आकाराची पक्ष कार्यालये वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार सध्या सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या जुन्या इमारतीतील तळ मजल्यावरील कार्यालयांच्या नुतनीकरणाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यानुसार भाजपला ज्यांचे जुने कार्यालय नुतनीकरण करून वितरीत केले जात आहे. या कार्यालयात शुक्रवारी विधीवत पुजा करून कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे भाजपचा महापौरपदाचा उमेदवार हा या कार्यालयातून औक्षण करून अर्ज भरण्यास जाणार आहे. यासाठी भाजपने अत्यंत तातडीने पुजाअर्चा उरकून घेण्याचा प्रयत्न केला.



शिवसेना आणि भाजप चेपणार उबाठाला


मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे कार्यालय शिवसेनेला सोडण्याचा विचार केला होता. परंतु काँग्रेसचे कार्यालय स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे उबाठाच्या वाट्याला असणाऱ्या जागेतील काही भाग कमी करून शिवसेनेला दिली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा भाग शिवसेनेला आणि भाजपच्या शेजारील कार्यालयाचा भाग उबाठाला सोडला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या मधोमध उबाठाचे कार्यालय राहणार असल्याने या महायुतीच्या पक्षाकडून उबाठाला चेपले जाणार आहे.



मनसे आणि एमएमआयएम साथ साथ


मुंबई महापालिकेच्या जुन्या इमारतीतील तळ मजल्यावर महिला आणि बाल कल्याण समितीच्या कार्यालयाचा भाग विभागून मनसे आणि एमआयमएमला दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत मनसे आणि एमआयएम हे पाठिला पाठ लावून बसणार आहे. हे दोन्ही पक्ष कार्यालये बाजु बाजुला असणार आहेत.

Comments
Add Comment

Burglary at Sachin Ahir Residence : धक्कादायक! १८ हजार पगारावर असणाऱ्या नोकराने मारला अडीच कोटींचा डल्ला; एका टीपमुळे सचिन अहिर यांच्या घरातील चोरीचा पर्दाफाश

मुंबई : शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या तब्बल २

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक