मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही खाण बेकायदेशिररित्या चालवली जात होती. खाणीत काम सुरू असताना थांगस्कू भागात स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जण भाजला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक प्रकट केला. पंतप्रधान कार्यालयाने नियमानुसार मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत जहीर केली. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


दुर्घटनेमुळे कोळसा खाणीत काम करत असलेले अनेकजण अडकून पडले आहेत. खाणीत अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले. दुर्घटना झाली त्यावेळी खाणीत नेमके किती जण कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला प्रथमोपचारांनंतर शिलाँग येथील मोठ्या रुग्णालयात दाखल केले आहे.


खाणीत झालेल्या स्फोटाची सखोल पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट नेमका कशाचा होता हे तपासातून कळेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन