राज्यातील कोणत्या महापालिकेत कोण झाले महापौर ? वाचा सविस्तर यादी

मुंबई : राज्यात विविध महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. राज्यातील जवळपास आठ ते दहा महापालिकांच्या महापौर पदाची निवडणूक संपन्न झाली असून महापौरपदी कोण बसणार, याची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. भाजपाने महापालिका निवडणुकीच्या निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेने आपला दबदबा राखला. कोणत्या पक्षाचा महापौर कुठे याची संपूर्ण यादी वाचा...


पुणे महापौर-मंजुषा नागपुरे (भाजप)


महापालिकेच्या महापौरपदासाठी (PMC Mayor) भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली. मंजूषा नागपुरे या अनुभवी नगरसेवक आहेत.


पुणे महापालिकेसाठी वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, नागपुरे यांच्या नावांवर पक्षनेतृत्वात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम निर्णय मंजुषा नागपुरे यांच्या बाजूने आल्याने पुणे महापौरपदी त्यांची नियुक्ती झाली.


 

ठाणे महापौर- शर्मिला पिंपळोलकर (शिवसेना)


ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून महापौर पदाचा चार्ज स्वीकारला आहे.. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दौऱ्यावर असल्याकारणाने महापौर शर्मिला पिंपळोलकर या महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या नाहीत शिंदे ठाण्यात आल्यानंतर शर्मिला या कार्यालयात खुर्चीवर विराजमान होणार आहेत.


 

कल्याण डोंबिवली-हर्षाली चौधरी थविल


कल्याण डोंबिवली महापालिकेला अखेर महापौर मिळाला असून, शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे. राहुल दामले यांची उपमहापौरपदी निश्चित निवड झाली आहे.


 

जळगाव-दीपमाला काळे (भाजप)


जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महायुतीकडून भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी दोन्ही नावांची थेट घोषणा केली.


 

अहिल्यानगर- ज्योती गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)


 

अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे यांची तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची नावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केली.


 

मिरा भाईंदर- डिंपल मेहता-(भाजप)


मिरा भाईंदरच्या महापौरपदावरून मराठी एकीकरण समितीने इशारा देऊनही भारतीय जनता पक्षाने डिंपल मेहता यांची निवड केली. मिरा भाईंदरमध्ये मराठी महापौरच झाला पाहिजे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती. परंतु भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांना महापौरपदी बसविण्यात आले आहे.


 

वसई विरार- अजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)


वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांना महापौरपदी बसण्याची संधी मिळाली आहे. बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले परंतु भारतीय जनता पक्षानेही महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. परंतु महापौरपदाच्या निवडणुकीत अजीव पाटील यांनी बाजी मारली.


 

उल्हासनगर- अश्विनी निकम (शिंदेसेना)


उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अश्विनी निकम यांना महापौरपदी बसण्याची संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेची गणिते जुळवून आणून महापौरपदावर शिवसेनेचा व्यक्ती बसवला.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ?

मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी

भाजप आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयात

बेलापूर : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नवी मुंबई येथील