Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पेटला. अखेर नगरसेवकांना घेऊन वडेड्डीवार दिल्लीत दाखल झाले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर वाद निवळला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या वादाच्या निमित्ताने स्थानिक नगरसेवकांची दिल्लीवारी झाली आहे.


चंद्रपूरातील महापौर मुद्द्यावर राजधानी दिल्लीत काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. सोबतच काँग्रेस नेते सुनील केदार आणि खासदार शामकुमार बर्वे देखील उपस्थित होते. जवळपास 45 मिनिटं झालेल्या बैठकीत महापौर पदाचा तोडगा निघाला अशी माहिती समोर येत आहे.


वडेट्टीवारांची नगरसेवकांना घेऊन दिल्लीवारी


मागील काही दिवसांपासून चंद्रपूर पालिकेत सत्ता स्थापन करण्यावरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही नेत्यांनी निवडून आलेले आपले समर्थक नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. वडेट्टवार यांनी आपले समर्थक नगरसेवक आपल्यासोबत ठेवले होते. आज दिल्लीत सगळ्या समर्थक नगरसेवकांना घेऊन वडेट्टीवार दिल्लीत पोहोचले. एका मिनी बसमध्ये सगळ्या नगरसेवकांना घेऊन ते दिल्लीत गेले. जवळपास 19 नगरसेवक हे वडेट्टीवार यांच्यासोबत होते.


दिल्लीच्या बैठकीत घडलं काय ?


चंद्रपूर महानगरपालिकेतील जवळपास काँग्रेसचे 19 आणि 2 अपक्ष नगरसेवक दिल्लीत दाखल झाले होते. जवळपास 45 मिनिटं बैठक झाली. राजधानी दिल्लीतील 51 लोधी इस्टेट इथं ही बैठक झाली. काँग्रेस पक्षाचा महापौर होईल हे बैठकीत दोन्ही नेत्याकडून वदवून घेण्यात आले. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापौरपद हे वडेट्टीवार यांच्या गटाला मिळते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला काय पद मिळणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा सल्ला घेण्यात आला होता. के सी वेणुगोपाल यांनी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांना समोरासमोर बसून महापौराचा मुद्दा निकाली काढण्याचा निर्णय वदवून घेतला. महापौर पदासंदर्भात अजून एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी