Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या प्रवाशांनाच प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई ते नांदेड या प्रस्तावित रेल्वेगाडीला मंजूरी मिळूनही आता तब्बल २ वर्षे झाली तरीही ही गाडी अजूनही फक्त कागदावरच असल्यानं प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.


ऑगस्ट २०२३ रेल्वे बोर्डानं एलटीटी ते नांदेड या नवीन रेल्वेला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र,या गाडीच्या उद्घाटनाची फेरी काढून दररोज ही सेवा सुर करण्याचे आदेशही दिले गेले होते. पण, आज २ वर्षे झाली तरी या मार्गावर एकही गाडी धावली नाही.


ही गाडी नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण सध्या या भागात मुंबईसाठी हव्या
तशा रेल्वे गाड्या नाहीत. ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रचंड गर्दी आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. वंदे भारत सारख्या महागड्या गाड्या या सर्वसामान्यांना परवडत नाही, त्यामुळे प्रवाशांना हतबल होऊन खाजगी बसनं महागडा प्रवास करावा लागत आहे.



विशेष म्हणजे नांदेडची गाडी रखडली असताना मध्य रेल्वेनं मुंबई ते धनबाद अर्थात बिहारसाठी नवीन साप्ताहिक गाडी ८ एप्रिल
२०२६ पासून सुरु केली आहे. याबाबत मराठवाड्यातील जनतेनं परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात असताना महाराष्ट्रातील हक्काच्या रेल्वेकडे दुर्लक्ष का केले जात आहे?असा प्रश्न विचारत आहेत.


माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं की, बऱ्याच तांत्रिक अडचणी आणि वाहतुकीच्या कारणांमुळे ही गाडी सुरु होऊ शकली नाही, मात्र, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांत हे प्रयत्न नक्की यशस्वी होणार याची प्रतीक्षा नांदेडकर करत आहेत.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि