राऊत हे उबाठाचे प्रवक्ते आहेत की पवार, काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल


मुंबई : संजय राऊत हे अधिकृतपणे उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून भाजपावर उठसूठ बिनबुडाची टीका करत असतात. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांमुळे ते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.या प्रश्नाचे उत्तर राऊतांनी द्यावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांचे दलाल आणि मुखिया म्हणून राऊतांची नियुक्ती झाली आहे का असा सवालही श्री. बन यांनी केला.


राऊत उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते म्हणून मिरवतात. मात्र प्रत्यक्षात ते राजकीय भूमिका शरद पवारांच्या हिताची घेतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. उबाठा गटाचे प्रवक्ते असताना प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम राऊतांनी तात्काळ बंद करावे असे स्पष्ट शब्दांत सुनावून श्री. बन म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे बघण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला पटेल अशी समतोल भूमिका घेत आहेत. राऊतांचे दोन पाय शरद पवार राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये आहेत अशा स्थितीत उबाठा गटामध्ये राऊतांचे डोके तरी आहे का ?, की डाव्या आघाडीकडे डोके गहाण ठेवले आहे असा बोचरा सवाल श्री. बन यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संगमा, तारीक अन्वर, अरुण गुजराती यांनी पक्षहितासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज अचानक ‘पटेल’ या नावावर आक्षेप घेत राऊत राजकारण करत आहेत.


राष्ट्रवादीचा ताबा घेण्यासाठी टपून बसलेल्या डोम कावळ्यांपासून पक्षाने सावध रहावे


अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही डोमकावळे टपून बसले आहेत. त्या डोम कावळ्यांपैकी एक राऊत आहेत. अशा डोम कावळ्यांपासून राष्ट्रवादी पक्षाने सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंबे एकत्र येणार असतील, तर भाजपाचा त्याला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. त्या जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल. परंतु त्याआधी अजितदादांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमके मत काय होते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नव्हती.


महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाला महापालिका निवडणुकीत खरी जागा दाखवून दिली आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये उबाठा गटाला एकही जागा मिळालेली नसून, पक्षाचे संघटन देखील अस्तित्वात राहिलेले नाही. तसेच कर्जत-जामखेडमध्ये जनतेने रोहित पवारांना नाकारले होते. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर केला नसता, तर त्यांचा पराभव निश्चित होता, असा आरोपही श्री. बन यांनी केला.


भारत – अमेरिका व्यापार करार हा नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे.


भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नेतृत्व सक्षम आणि दूरदृष्टीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज जगभरात भारताचा सन्मान वाढत असून, अमेरिकेसारखा सामर्थ्यशाली देश पुन्हा एकदा भारतासोबत आला आहे. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा तो विजय आहे. मात्र राऊत जाणीवपूर्वक राहुल गांधींची भाषा वापरत जागतिक पातळीवर भारताचा आणि देशाच्या नेतृत्वाचा अपमान करून देशाच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम करत आहेत, असा आरोप श्री. बन यांनी केला. देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करत नाही हे राऊतांनी लक्षात ठेवावे असेही श्री. बन यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे