शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली


मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असून हे काम सध्या रखडलेले आहे. परंतु, या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना अर्धवट काम राहिलेल्या मंडईतील तळघरातील वास्तूत पुन्हा जागा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये निम्म्या कोळी भगिनींचा बाजारच उठवला गेला आहे. विशेष म्हणजे या मंडईत मागील पाच वर्षांपासून या कोळी भगिनींचे पुनर्वसन केले असले तरी याठिकाणी पिण्यासह इतर पाण्याची तसेच गटार तुंबून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे . त्यामुळे आधीच निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला आता ज्या व्यवसाय करतात त्यांच्या समस्येकडेही बाजार विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने कोळी भगिनींनी याठिकाणी व्यवसाय करायचा कसा असा सवाल केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने परेल येथील शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंडईच्या जागी मासळी बाजारसह मार्केट आणि कामगार वसाहत अशाप्रकारे बांधकाम हाती घेतले आहे.. परंतु, या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून चार मजल्यांचे बांधकाम झाल्यानंतर विकासकाने अर्धवट सोडून दिल्यानंतर जिथे कोळी बांधवांना मागील बाजुस दिलेल्या पर्यायी जागेतून हलवून या अर्धवट वास्तूमध्ये आणले गेले. परंतु याठिकाणी परवानाधारक सर्वच कोळी भगिनींची जागा उपलब्ध नसल्याने अर्ध्याच कोळी भगिनींना याठिकाणी बसता येते. परिणामी निम्म्या कोळी भगिनींना मार्केटमध्ये बसण्याचीच जागा सल्याने त्याठिकाणी केवळ ५० कोळी भगिनींनाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


या मार्केटमधील कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी पर्यायी जागेवरुन हटवून अर्धवट काम झालेल्या मंडईतील तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली. तीसुध्दा निम्म्याच कोळणींना बसण्याची जागा दिली. या मार्केटमध्ये एकूण ११४ परवानाधारक कोळी भगिनी होत्या. पण आता त्यात बसण्याची जागा नसल्याने आणि काही कोळी भगिनी येत नाहीतर काहींना वयोमानानुसार बेसमेंटमध्ये टोपल्या घेवून जाणे शक्य नसल्याने त्यांनी येणे टाळले.


विशेष म्हणजे या मार्केटमध्ये सुरुवातील सीसी टिव्हीपासून सर्व सुविधा दिल्या होत्या, पण आता तिथे माशांकरता तसेच स्वच्छतागृहांसाठी पाण्याची सुविधा नाही. जर माशांवर शिंपडण्यासाठी पाणीच नसेल तर मासे कसे टिकणार असा सवाल करत कोळी भगिनींनी तेथील टॉयलेटसाठी पाणी नसल्याचीही खंत व्यक्त केली . तसेच ही जागा बेसमेंटमध्ये असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही, परिणामी मासे खरेदी करणाऱ्यांना या सांडपाण्यात उभे राहावे लागते,तसेच यामुळे उंदिर तसेच घुशींचा त्रासही सहन करावा लागतो. महापालिकेच्या मार्केट विभागाचा अधिकारी कधीही या मार्केटमध्ये येत नाही की कोळी भगिनींच्या तक्रारींची दखल घेत नाही. त्यामुळे नक्की मासळी बाजार हे कोळी भगिनींना व्यवसाय करण्यासाठी आहेत की त्यांचा बाजार उठवण्यासाठी आहे असा सवाल कोळी भगिनींकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त