Vijay Wadettiwar: गल्लीतला वाद दिल्लीत नेणाऱ्या काँग्रेसच्या वडेट्टीवारांना पक्ष नेतृत्वापाठोपाठ विभागीय आयुक्तांनी दिला दणका

नागपूर: काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादात दिल्लीमध्ये तोडगा निघाल्याचा चित्र दिसत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला झुकते माप देत महापौर पद त्यांच्या गटाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार गटाने आपली ताकद दाखवण्यासाठी 19 नगरसेवक दिल्लीत हजर केले होते. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना केवळ उपमहापौर पद देण्याचे सांगत माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना धक्का दिला आहे. यासोबतच, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार सुरेंद्र अडबाले हेच महापालिकेत काँग्रेसचे गटनेते असतील, यावरही दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आले.


सोमवारी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नगरसेवकांनी फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री केली होती. दोन बसेसमधून हे नगरसेवक आले होते. त्यांच्यासोबत कित्येक चारचाकी गाड्याही आल्या होत्या. या सगळ्यात ताफ्यातून 19 नगरसेवक नागपूरच्या विभागीय कार्यालयात स्वतंत्र गट नोंदणीसाठी आले होते. सचिन कत्याल यांनी गटनेता म्हणून विभागीय आयुक्तांना नोंदणीसाठी पत्र दिले होते. इतकं सगळं केल्यानंतर नागपूर विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार गटाच्या स्वतंत्र गट नोंदणीच्या प्रस्तावाला कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे नाकारले.


विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवारांच्या नगरसेवकांची गटनोंदणी नाकारली


विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सचिन कत्याल यांना दिलेल्या पत्रात सांगितले की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्यता अनर्हता अधिनियम 1986 नुसार एकाच पक्षाचे दोन स्वतंत्र गट नोंदवता येत नाहीत. या प्रस्तावात 17 नगरसेवक हजर होते, तर काँग्रेसचे एकूण 27 सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय 4 नगरसेवकांनी दोन्ही गटांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यामुळे स्पष्टतेचा अभाव असल्याचे ताशेरे ओढत आयुक्तांनी 6 तांत्रिक त्रुटी काढल्या आहेत. आता काँग्रेसच्या सर्व 27 सदस्यांनी एकत्रितपणे नोंदणी प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.


दरम्यान, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसणार का ? या प्रश्नाचे उत्तर खुद्द काँग्रेसमधली लोकंही ठामपणे देऊ शकत नाहीत. काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले आहे. मात्र हा प्रस्ताव त्यांना मान्य आहे की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही.


Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने अटकेत असलेल्या सहा पैकी पाच

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये

The Black Market : वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा शिधावाटप यंत्रणेने

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

- अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे

Affordable rental houses : मुंबईत उभारणार भाडेतत्त्वावरील परवडणारी घरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे निर्देश मुंबई : मुंबईमध्ये नोकरी,