नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने अटकेत असलेल्या सहा पैकी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि एचआर तसेच ऑपरेशन्स मॅनेजर अश्विनी चेनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. न्यायमूर्ती आर. सी. नरवाडिया यांनी हा निर्णय दिला. तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि असिफ अन्सारी या पाच जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चेनानीला पुण्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाची कसून पोलीस चौकशी चालली असून आरोपींच्या विरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात सीसीटीव्ही फूटेज आणि तक्रारदारांनी दिलेली माहिती या दोन्हीच्या आधारे कारवाई सुरू आहे. पोलीस तपास करून ठोस पुरावे गोळा करत आहेत. विशेष तपास पथक या प्रकरणी तपासकाम करत आहे. आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात लवकरच न्यायालयात हजर करून त्यांचीही पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते.



नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली. यानंतर पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन केले. एका सॉफ्टवेअरशी संबंधित कामाचे निमित्त करून वेशांतर केलेल्या महिला पोलिसांची टीम कंपनीत आली होती. पूर्ण तयारी करून आलेल्या या पोलिसांनी कामाचे निमित्त करून एका मीटिंगची मागणी केली. या मीटिंगच्या वेळी आरोपींनी महिलांशी अश्लील चाळे आणि गैरवर्तन केल्याचे महिला पोलिसांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. सीसीटीव्ही फूटेज, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती इतर ठोस पुरावे हाती येताच पोलिसांनी कारवाई केली.


पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन माहिती दिली. यामुळे आतापर्यंत नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कंपनीत कामाच्या निमित्ताने अनेक कर्मचारी एकत्र बसत होते. यातील इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांचे सातत्याने ब्रेनवॉशिंग केले जात होते. कंपनीतले उच्चपदस्थ अधिकाराचा गैरवापर करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत होते. काही तरुणांनाही धर्मांतर करण्यासाठी ब्रेनवॉश सुरू असल्याचा अनुभव आला होता.



आतापर्यंत दोन विवाहित महिलांसह एकूण आठ तरुणींनी लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या तक्रारी दिल्या आहेत, ज्यावरून ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून पीडितांवर त्यांच्या मूळ धर्माचा त्याग करून एका विशिष्ट धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकला जात होता. करिअरचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण तरुणींच्या हतबलतेचा फायदा घेत, त्यांच्यावर धार्मिक विचार लादण्याचे हे मोठे रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले आहे.


कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास चक्रं फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी संबंधित कंपनीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या